॥ आरती साईं बाबा ॥

आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा।

चरणरजातळीं, द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा॥

जाळूनियां अनंग, स्वस्वरूपीं राहे दंग।

मुमुक्षुजनां दावी, निज डोळां श्रीरंग॥

आरती साईबाबा॥

जया मनीं जैसा भाव, तया तैसा अनुभव।

दाविसी दयाघना, ऐसी तुझी ही माव॥

आरती साईबाबा॥

तुमचे नाम ध्याता, हरे संसृतिव्यथा।

अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा॥

आरती साईबाबा॥

कलियुगीं अवतार, सगुणब्रह्म साचार।

अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबर॥

आरती साईबाबा॥

आठां दिवसां गुरुवारीं, भक्त करिती वारी।

प्रभुपद पहावया, भवभय निवारी॥

आरती साईबाबा॥

माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरजसेवा।

मागणें हेंचि आतां, तुम्हां देवाधिदेवा॥

आरती साईबाबा॥

इच्छित दीन चातक, निर्मळ तोय निजसुख।

पाजावें माधवा या, सांभाळ आपुली भाक॥

आरती साईबाबा॥